Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्यादृष्टीने नवीन टीम काम करणार आहे: सुनील तटकरे


मुंबई : 
आम्ही सामुदायिकपणे काम करायचे ठरवले असून अजितदादांचा अर्थखात्याचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित निर्णय घेतल्याने खातेवाटप झाले आहे. राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्यादृष्टीने नवीन टीम काम करणार आहे असा विश्वास व्यक्त करतानाच या नवीन टीमला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



तीन पक्षाचे सरकार असते त्यावेळी सगळ्या बाबी असतात. महत्त्वाची व जनतेच्या सेवेच्यादृष्टीने असलेली खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मिळाली आहेत त्याबद्दल आम्ही समाधानी आहेच शिवाय हे सर्व मंत्री मिळालेल्या खात्याचा कारभार उत्तमरित्या करतील असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. 




सध्या आमच्या सर्व आमदारांसोबत माझ्या बैठका व गाठीभेटी होत आहेत. अधिवेशन काळातही यासंदर्भात बैठका होतील तो निर्णय विधीमंडळ नेते अजितदादा पवार घेतील असेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.