गडहिंग्लज (प्रतिनिधी): कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचालित गडहिंग्लज येथील शिवराज इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये वार्षिक शालेय क्रिडा महोत्सवाला प्रारंभ झाला.
शिवराज कॉलेजच्या प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजचे प्रा. तानाजी चौगुले, पंचायत समिती मंडळाचे समन्वयक हरीश पाटील, दयानंद कोरवी, शिवराज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ए. बी पाटील, मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. दिपा आंबोलकर यांनी केले. सौ. समिना नदाफ यांनी आभार मानले.


