Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे खणदाळच्या लक्ष्मी दूध संस्थेच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला कार्यक्रम


हलकर्णी : खणदाळ येथील श्री लक्ष्मी दुध संस्थेच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी डॉ. गंगाधर व्हसकोटी, रामलिंग दुध्यागोळ, राजू पाटील व इतर मान्यवर.


हलकर्णी (वार्ताहर): खणदाळ येथील श्री लक्ष्मी दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार जोतिबा  परीट, चनबसू चौगुले, राजेंद्र जाधव, काकासाहेब मोकाशी यांचा सत्कार  सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी, राजू पाटील, चनबसू अगसगी यांच्या हस्ते करण्यात आला. हलकर्णी येथील डॉ. व्हसकोटी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. 


 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गंगाधर व्हसकोटी, रामलिंग दुध्यागोळ, माजी सरपंच उमेश इंगळे, भागोजी गवळी, राजू पाटील, चनबसू अगसगी, उत्तम जाधव, अजित पाटील, अशोक नवलगी, अशपाक पाकजादे, मारुती पाटील ,बबन पाटील, हसन मुलाणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.