Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरात आता बांधकाम परवाना देताना 'वृक्ष प्राधिकरण शुल्क' आकारणार

शहरातील हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी घेण्यात आला निर्णय 


प्राधिकरण समितीची पार पडली बैठक 



गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज शहरातील निवासी व वाणिज्य बांधकाम परवाना देताना नगरपरिषद मार्फत "वृक्ष प्राधिकरण शुल्क" आकारणी करण्यात येणार आहे. याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.



गडहिंग्लज नगरपरिषदमार्फत वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची दर महिन्याला बैठक घेण्यात येते. समिती मार्फत शहरातील झाडांची देखभाल, निगा राखणे, नविन वृक्ष लागवड करणे, झाडे बेनने इत्यादी कामे करण्यात येतात. तसेच समितीमार्फत झाडे तोडण्याची परवानगी देण्यात येते. समितीमध्ये मुख्याधिकारी अध्यक्ष असून शहरातील इतर प्राध्यापक व नागरिक सदस्य आहेत.


या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. झाड तोडण्यास परवानगी देताना त्याच्या मोबदल्यात रोपे घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच सध्या शहरामध्ये मोठया प्रमाणात घर व वाणिज्य बांधकाम करण्यात येत आहे. यामुळे विविध ठिकाणी वृक्षांची तोड होत आहे. याकरीता शहरामध्ये झाडांची संख्या वाढवुन हरीत क्षेत्रामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. दिनांक १ जानेवारी २०२४ पासून बांधकाम परवाना देताना "वृक्ष प्राधिकरण शुल्क" लागू करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण समिती मार्फत घेण्यात आला आहे.


वृक्ष प्राधिकरण शुल्क संकलन करुन त्याचा वापर शहरामध्ये हरीतक्षेत्र वाढ होण्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच वृक्षप्राधिकरण समितीची नव्याने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठीकीला मुख्याधिकारी स्वरुप खारगे, समिती सदस्य धोंडीबा काटकर, नरेंद्र भद्रापूर, चिन्मय देशपांडे, सौ. सरीता भैसकर,  विकास साठे, अनिल मगर, सागर पाटील, अनिल गंदमवाड उपस्थित होते.


वृक्ष प्राधिकरण शुल्क पुढील प्रमाणे-


 निवासी घरांसाठी...

१) ५० चौ. मि. पर्यंत "वृक्ष प्राधिकरण शुल्क" लागू नाही.


२) ५० चौ.मि. ते १०० चौ.मि. पर्यंत रु. ५००


३) १०० चौ.मि. ते १५० चौ.मि. पर्यंत रु. १०००



 वाणिज्य घरांसाठी... 


१) १० युनिटपर्यंत असलेल्या अपार्टमेंटला रु. १५००


२) १० युनिट पेक्षा जादा असल्यास प्रथम १० युनिटसाठी १५०० व तिथून पुढे प्रत्येकी एक युनिटला रु. १००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.