Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

औरनाळ- सावंतवाडी येथे 14 जानेवारी रोजी मिनी मॅरेथॉन स्पर्धा

कै. पैंजण या श्वानाच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन  



गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
तालुक्यातील औरनाळ/ सावंतवाडी येथे कै. पैंजण या श्वानाच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता  मुले व मुलींसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



25 वर्षाखालील मुले गटातील विजेत्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे 3001, 2001, 1501, 1001 व पाचव्या क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात येणार आहे. मुलींच्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे  2001, 1501, 1001, 701 व पाचव्या क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात येणार आहे.


17 वर्षाखालील गटात मुलांमधील विजेत्यांना अनुक्रमे 1501, 1001, 701, 501 व पाचव्या क्रमांकासाठी ट्रॉफी. मुलींच्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे 1201, 801, 601, 401  व पाचव्या क्रमांकाला ट्रॉफी.


14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील गाव मर्यादित मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 701, 501, 301, 201, 101 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.


या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनिकेत कांबळे, सचिन कांबळे, करण मोरे, अतिश भोसले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.