Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे पूजन


कोल्हापूर :
श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये अयोध्येतील 22 जानेवारीच्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी प्राणप्रतिष्ठा समितीकडून आलेल्या अक्षता कलशाचे पूजन करुन महालक्ष्मी व परिक्रमेतील सर्व देवतांना अक्षता, निमंत्रण पत्रिका व राम मंदिर प्रतिमा देऊन आमंत्रित करण्यात आले. 


या अक्षता कलशाची मंदीर परिसरात पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. मंदिरामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी या अक्षता कलशाचे दर्शन घेऊन आमंत्रण स्वीकारले.


यावेळी  रा स्व संघ शहर संघचालक  प्रमोदराव ढोले, श्री पूजक केदार मुनीश्वर, ऐश्वर्या मुनिश्वर, संतोष घोडगिरिकर, रणजीत घाटगे, संतोष अतिग्रे तसेच प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.