सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): अयोध्याहून आलेल्या मंगल अक्षता कलशाची गडहिंग्लज शहरात मिरवणूक काढण्यात आली. अयोध्या येथे २२ जानेवारीला श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे यासाठी आमंत्रण घेऊन हा मंगल कलश देशभरात नेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून या मंगल अक्षता कलशाद्वारे भाविकांना आमंत्रण देण्यात आले. या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय बनले होते.










