Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून राष्ट्रसेवा दलाच्या जिल्हा मेळाव्याला शुभेच्छा

                                                 छायाचित्र  : मज्जीद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील साधना प्रशालेत राष्ट्र सेवा दलामार्फत पुज्य साने गुरूजी शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचे औचित्य साधून प्रशालेस भेट देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आले होते.



झांजपथकाने महाराजांचे आगमन करण्यात आले. महाराजांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रसेवा दलाचे कार्यवाहक बाबासाहेब नदाफ यांनी केले. दरम्यान, महाराजांचा सत्कार संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर यांचे हस्ते झाले. ज्ञानराजा चिघळीकर, सिध्दार्थ बन्ने यांनी आपली मनोगते व्यक्त केली. वसंतराव मुळीक यांनी शाहूंच्या विचारांना उजाळा दिला.



"गडहिंग्लज शहर हे राष्ट्र सेवा दलाचा वारसा जपण्यात अग्रेसर आहे" हे महाराजांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य रफिक पटेल यांनी मानले.



सुत्रसंचालन सुरेश दास यांनी केले. कार्यक्रमास रणदिवे गुरूजी, मुख्याध्यापक श्री. शिलेदार, बाळेश नाईक, पी.डी. पाटील, अनिल पाटील, तानाजी चौगुले, साताप्पा कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.