Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजीराव माने कॉलेजच्या वैष्णवी रावळ हिची 'राष्ट्रीय क्रॉसकंट्री'मध्ये चमकदार कामगिरी



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंद्रपूर येथे झालेल्या शालेय शासकीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रॉसकंट्री या क्रीडा प्रकारामध्ये संभाजीराव माने जुनिअर कॉलेजच्या कु. वैष्णवी राजेंद्र रावळ या खेळाडूने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच 800 मीटर व पंधराशे मीटर धावणेमध्ये सहभाग मिळाला.


कु. वैष्णवीच्या या यशाचे महाविद्यालयाच्यावतीने प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. तिला शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत पाटील, डॉ. राहुल मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.