Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात 'स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप' विषयावर कार्यशाळा संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत 'स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम. कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे व प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



या कार्यशाळेचे उदघाटन शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभाग प्रमुख प्रा.एम.बी.ईकिले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. रंगराव हेंडगे यांनी करून दिला. स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. के.ए. जोशी यांनी 'स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासाच्या दिशा' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली.



दुपारच्या सत्रात प्रा. अमेय सबनीस यांनी 'स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप' या विषयावर सविस्तरपणे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे, प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह गडहिंग्लज, आजरा व चंदगड भागातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या कार्यशाळेतील सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. अशोक मोरमारे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.