Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात गडहिंग्लजला आंदोलन

विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिकात्मक फलकाची केली होळी 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल बुधवारी दिला होता. या निकालाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत गडहिंग्लजला आंदोलन केले. सदर आंदोलन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.



येथील दसरा चौकात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतीकात्मक फलकाची होळी करण्यात आली. त्यानी दिलेल्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.



यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख दिलीप माने, डॉ. रियाजभाई शमनजी, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, युवा सेनेचे प्रतीक क्षीरसागर, संभाजी येरुडकर, भरत जाधव, पांडुरंग जगताप यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.