स्वामी विवेकानंद जयंती निमित्य आयोजन
विद्यार्थ्यांनी केले पुस्तकाचेही वाचन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येणेचवंडी येथील ज्ञानदीप वाचनालय येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्य पुस्तक वाचन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्रीधर मांगले, राजेश चव्हाण, दशरथ राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वि. मं. येणेचवंडीचे मुख्याध्यापक श्रीधर मांगले, श्री शिवराय हायस्कूल नंदनवाडचे मुख्याध्यापक राजेश चव्हाण, प्रकाश जोडगुद्री, अमित नंद्यानावर , विनायक पोवार , श्री. पाटील , श्री. ढवणे, सदाशिव कुराडे, विजय इंगळे, श्रीकांत मांगले, परशराम भोसले, आनंदा कुराडे, राजू कुराडे उपस्थित होते.
प्रास्ताविक नीळकंठ कुराडे यांनी केले. आभार प्रा. प्रकाश इंगळे यांनी मानले.




