Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी



हलकर्णी (वार्ताहर): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.



प्रतिमा पूजन मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्नेहा हत्तरकी, प्रिती तुपुरवाडी, पूजा कोळी, सिद्धी चौगुले यांनी आपल्या मनोगतातून व कवितेतून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला उजाळा दिला.



इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी पोवाडे, निबंध, चारोळी, काव्य लेखन करून भितीपत्रक तयार केले होते. त्यानंतर "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालक, शाळा व विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहन पत्राचे वाटप करण्यात आले. परिपत्रकाचे प्रकट वाचन कु. प्रियंका कोरे हिने केले. सहाय्यक शिक्षिका डी. एस. बंदी यांनी सूत्रसंचालन केले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.