Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ.ए.डी.शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महागावात विविध सामाजिक उपक्रम

परशुराम तलाव परिसर, स्मशानभूमीची स्वच्छता व रंगकाम


साई मंदिर परिसरात वृक्षारोपण, तलावात पाणी येणाऱ्या पाटाची जेसीबीने खोदाई


ग्रामपंचायत  कार्यालयाला कपाट भेट


सैनिक भवनात रक्तदान शिबिराचेही आयोजन 


ॲड. श्रीपतराव शिंदे शिक्षण संकुलाचे ग्रामस्थांकडून कौतुक



महागाव : जेसीबीच्या सहाय्याने पाटाच्या खुदाईचे सुरुवात करताना प्रा. सौ. स्वाती कोरी, महेश कोरी, प्रशांत शिंदे, संदिप कोकितकर यांच्यासह इतर. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथे डॉ. ए.डी. शिंदे यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त ॲड. श्रीपतराव शिंदे शिक्षण संकुल भडगाव व महागाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक स्वच्छता मोहीम, वृक्षारोपन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.




या शिबिराचे उदघाटन सरपंच प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार, कॅप्टन महादेव घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.




सरपंच प्रशांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेच्या सचिव आणि माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी, प्रा.रोहित साव्यानावर यांनी मनोगतात उपक्रमाची माहिती सांगितली.




सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य  हृदयनाथ सोमशेट्टी यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.एस. एम.कुरबेट्टी यांनी मानले. यावेळी ॲड. श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहाच्यावतीने परशुराम तलावाचा परिसर, स्मशानभूमी स्वच्छता व रंगकाम केले. साई मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. नैसर्गिकरित्या परशुराम तलावात पाणी येणाऱ्या पाण्याच्या पाटाची खोदाई दोन दिवस जेसीबीच्या साह्याने करण्यात आली. शिक्षण समूहमार्फत ग्रामपंचायत कार्यालयाला कपाट भेट दिले. यावेळी सैनिक भवनात रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते. यामध्ये ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या विधायक उपक्रमाचे महागाव परिसरातून कौतुक होत आहे.




या उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या सचिव आणि माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वाती कोरी, सल्लागार व माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, प्राची कोरी, डॉ.ए.डी.शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे,राधाबाई शिंदे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. एम.कुरबेट्टी, प्राचार्य ए. एस.शेळके, प्राचार्य शरद किल्लेदार, प्रा.साजिद सोलापुरे, सागर शिंदे यांनी केले होते.




यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरज आसवले, हृदयनाथ सोमशेट्टी, विकास इंगवले, परशुराम हुले, वैशाली पाटील, अनिता रेडेकर, नजीर बागवान यांच्यासह आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, ॲड. श्रीपतराव शिंदे शिक्षण संकुलचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.