Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागृती हायस्कूलच्या उपमुख्याध्यापक पदी उमेश सावंत



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील विद्या प्रसारक मंडळ संचालित जागृती हायस्कूलच्या उपमुख्याध्यापक पदी विज्ञान शिक्षक उमेश सावंत यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी दिले आहे. या निवडीबद्दल डॉ. घाळी यांनी उपमुख्याध्यापक श्री. सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी संचालक महेश घाळी, मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, मनोहर गुलगुंजी, श्रीरंग तांबे, बाळासाहेब कुंभार, सुशांत घाळी, महादेव हजाम, उदय पोवार उपस्थित होते. या निवडीबद्दल उमेश सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.