Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव फुटबॉल लीगमध्ये 'एसबी आर्मी'ला विजेतेपद

राजवीर एफसी ठरला उपविजेता


आप्पी पाटील एफसी तिसरा




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे पार पडलेल्या फुटबॉल लीगच्या अंतिम सामन्यात 'एसबी आर्मी'ने राजवीर एफसीचा सडनडेथवर ५-४ असा पराभव करून विजेतेपदासह रोख अकरा हजार रुपये पटकाविले. अप्पी पाटील एफसीने डायनामोज एफसीला २-१ असे नमवून तिसरा क्रमांक मिळविला.  गेल्या दहा दिवसापासून जिल्हा परिषद विद्यामंदिरच्या क्रीडागंणावर या स्पर्धा सुरु होत्या. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली लीगचे यंदाचे हे तिसरे वर्ष होते.



साखळी स्पर्धेतील अव्वल प्रतिस्पर्ध्यांना हरवून एसबी आर्मी आणि 'राजवीर'ने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे सामना पाहण्यासाठी मैदान शौकीनांनी चहूबाजूंनी फुलूले होते. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघानी जोरदार खेळ केला. पण, भक्कम बचावामुळे निर्धारित वेळेत गोलची कोंडी फुटू शकली नाही. टायब्रेकरमध्येही ३—३ अशी बरोबरी कायम राहिली. सडनडेथमध्ये एसबी आर्मीच्या बदली गोलरक्षक अभिषेक कोरवीने 'राजवीर'च्या सौरभ मोहितेचा कमकुवत फटका अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला. एसबी आर्मीच्या अभिषेक कोरवी, भुषण जाधव, आसिफ शेख, विशाल चौगुले यांनी तर राजवीरच्या गुरुराज पाटगावे, श्रीधर चौगुले, राहुल रेगडे यांनाच गोल मारता आले.


पाटील एफसीने आयर्न दळवी, श्रीनिवास पुजारी यांच्या गोलच्या जोरावर डायनामोजला नमवून तिसरा क्रमांकासह रोख पाच हजारांचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेतील विजेत्या संघांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार, मारूती माने, बाळासाहेब मुर्ती यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रशिक्षक दीपक कुपन्नावर, विनायक चौगुले, अनिकेत कोणकेऱी, साजीद मुल्ला, मल्लापा चौगुले, विजयकुमार खमलेट्टी, दयानंद पट्टणकुडी, भाग्योदय पाटील, विठ्ठल पुजारी उपस्थित होते. पोलीस पाटील उदय पुजारी यांनी स्वागत केले. समन्वयक महेश हसुरे यांनी आभार मानले. मारूती साळवेकर यांनी सुत्रसंचलन केले.


स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू


सर्वाधिक गोल- आयर्न दळवी

गोलरक्षक-  कार्तिक सुतार

बचावपटू- गुरु पाटगावे

मध्यरक्षक- विशाल चौगुले

आघाडीपटू- श्रीनिवास पुजारी

उदयोन्मुख- पृथ्वीराज पुजारी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.