गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
देव दगडात नसून तो माणसांत आहे हे सांगणारे संत गाडगे महाराज यांनी अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेच्या नायनाटासाठी जीवन खर्ची केले. प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कु. प्रियंका कोरे या विद्यार्थिनीने संत गाडगेबाबांविषयी माहिती व दशसूत्री संदेश सांगितला. सर्व शिक्षकांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन केले. कु. डी. एस. बंदी यांनी सूत्रसंचालन केले. आभार एस. बी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास कर्मचारी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



