गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये पुणे येथील कमिन्स इंडिया या नामांकित कंपनीसाठी महाविद्यालयातील ३४ तर एकूण ७७ विद्यार्थ्यांची निवड झाली. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये गडहिंग्लजसह बार्शी, कोल्हापूर, सातारा, गारगोटी, भुदरगड परिसरातील सुमारे १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये इलेक्ट्रोनिक्स अँड कॉम्पुटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल डिप्लोमा विद्यार्थी सहभागी झाले होते.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीसाठी २ फेब्रुवारी रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. यामध्ये एसजीएम रुरल पॉलिटेक्निकचे ३४, के.पी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मुदाळ)- १२, के.बी.पाटील पॉलिटेक्निक सातारा -०८, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील अँड इंजिनिअरिंग गारगोटी- ०६, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर -०४, विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पाल)-०३. श्रीमान भाऊसाहेब झाडबुके इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, बार्शी- ०२, सातारा पॉलिटेक्निक सातारा -०२, डॉ.ए.डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-०२, तर डी. वाय, पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग बावडा, संजय घोडावत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अतिग्रे व गव्हर्मेंट रेसिडेन्स वूमन्स पॉलिटेक्निक, तासगाव यांचे प्रत्येकी एका विद्यार्थ्यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, संस्थासचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचारी, प्राचार्या आर. एस. पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्लेसमेंट विभागप्रमुख संतोष गुरव, विभागप्रमुख सौ. कविता कुरळे, प्लेसमेंट कोऑरडीनेटर विनायक रेडेकर, अमित डंगी, संजीविनी गाडवी व ए.आय. मुल्ला, श्रीनाथ रावण, स्वप्नाली दावणे यांचे सहकार्य लाभले. प्लेसमेंट विभागप्रमुख संतोष गुरव यांनी आभार मानले.

