गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर १,११,१११ साखर पोत्यांचे विधिवत पुजन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर व व्हाइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या उस उत्पादक ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कारखान्याला पालक मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ मिळाल्यामुळे यंदाचे गळीत हंगाम मोठ्या जोमाने सुरू झाले आहे. चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर आणि संचालक मंडळाने कारखान्यातील मशिनरींचे नूतनीकरण करूनच गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या गळीत हंगामाला उशीर झाला. आता कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. कारखाना कार्यस्थळावर आज १,११,१११ व्या साखर पोत्यांचे विधिवत पुजन उस उत्पादक ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर चंद्रकांत सावंत, विद्यमान संचालक अशोक मेंडुले, बाळासाहेब देसाई मंचेकर, विश्वनाथ स्वामी, ॲड. दिग्विजय कुराडे, सदानंद हत्तरकी, अरुण गवळी, काशिनाथ कांबळे, सौ. मंगल आरबोळे, सौ कविता पाटील, माजी संचालक प्रा.सुभाष शिरकोळे, बचाराम मोहिते, अरुणदादा हरळीकर, कार्यकारी संचालक महावीर घोडके, चिफ केमिस्ट गणेश पाटील, सिव्हिल इंजिनिअर मुकुंद पाटील, मुख्य शेती अधिकारी एल.बी.देसाई, भाजपचे तालुका चिटणीस मधुकर शिंदे, तालुका युवा सरचिटणीस सुनिल नांगरे, कार्यकारिणी सदस्य संजय पाटील अरळगुंडीकर, बसवराज आरबोळे, राहुल शिरकोळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

