गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात "पदवीनंतरच्या भविष्यातील नोकरीच्या संधी" यावर मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. प्रामुख्याने मेकॅनिकल व सिव्हील विभागासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्राफिक्स टेक्नोलोजीस प्रा. लि. पुणेचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर मोरे, कोल्हापूर शाखा प्रमुख रविंद्र थोरात, अजिंक्य इंगळे, सौ. कविता शिंदे हे उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये मेकॅनिकल व सिव्हील विभागातील भविष्यातील नोकरीच्या संधी व अद्यायावत सॉफ्टवेअर, त्यावर आधारीत नोकरी, कंपन्यांना आवश्यक असणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. सचिन चौगुले यांनी केले. समन्वयक म्हणून प्रा. वसुधा शिंदे यांनी काम पाहिले. प्रा. मोसिम मुल्ला यांनी आभार मानले. यावेळी प्रा. सचिन सनदी, प्रा. विनायक घाटगे, मेकॅनिकल व सिव्हील विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांचे मार्गदर्शन तर डॉ. विश्वस्त संजय चव्हाण, व डॉ. यशवंत चव्हाण यांचे सहकार्य लाभले.


