Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत उद्या गडहिंग्लजला पदाधिकारी संवाद कार्यक्रम

बुधवारी दिवसभर कोल्हापूर जिल्हा ग्रामीणमध्ये विविध कार्यक्रम


जिल्हा युवासेना प्रमुख अवधूत पाटील यांची माहिती 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) युवा सेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकारी संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.आज मंगळवारपासून या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर  उद्या बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी गडहिंग्लज- मुरगुड, कागल, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघात युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा ग्रामीण युवा सेनाप्रमुख अवधूत पाटील यांनी दिली आहे.



बुधवार दि.7 रोजी सकाळी 11-45 वाजता युवासेनेच्या वतीने युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. दुपारी 12-15 वाजता घाळी कॉलेज गडहिंग्लज येथील कॉलेज कक्षाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी 12-30 वाजता

भडगाव (ता गडहिंग्लज) येथे युवासेना शाखा स्थापन नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता गडहिंग्लज येथील कडगाव रोडवरील विश्रामबाग कॉलनीतील जिल्हा ग्रामीण शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना, युवासेनेच्या वतीने स्वागत,  पदाधिकारी भेटी, संवाद व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.


दुपारी 3 वाजता मुरगुड (ता कागल) युवासेनेच्या वतीने स्वागत व युवासेना शाखा स्थापन नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा सेना ग्रामीण जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.