Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला श्री बसव किरण स्वामीजींच्या पट्टाधिकार सोहळ्यानिमित्त ग्रंथदिंडी

वडरगे रोडवरील बेलबाग येथील जडेयसिद्धेश्वर आश्रमात १५ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम



                                                        छायाचित्र : मज्जिद किल्लेदार

गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील श्री जडेयसिद्धेश्वर आश्रमातील श्री बसव किरण स्वामीजींच्या पट्टाधिकार सोहळ्यास शहरातून  ग्रंथ दिंडी काढून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. वडरगे रोडवरील जडेयसिद्धेश्वर आश्रम (बेलबाग) येथे दिनांक १५ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. मुख्य पट्टाधिकार कार्यक्रम १४ व १५ फेब्रुवारीला पार पडणार आहे. महालक्ष्मी मंदिरापासून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. दरम्यान,  हिटणी, मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, दुंडगे येथे ज्योतीचे आगमन झाल्यानंतर सुवासिनी महिलांनी पंचारतीने ओवाळणी करून ज्योतीचे स्वागत केले.




यावेळी निडसोशी येथील दूरदुंडेश्वर मठ येथून आणलेल्या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी आश्रमासमोर निडसोशी मठाचे जगद्‌गुरू श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर शिवलिंगेश्वर महास्वामीजी व  चिक्कोडी येथील श्री संपादन महास्वामींजी यांच्या हस्ते ज्योतीचे तर तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले.  या पालखीत श्री बसवेश्वर महाराज व श्री अक्कमहादेवी यांचे वचन ग्रंथ ठेवण्यात आले होते. ही ग्रंथदिंडी महालक्ष्मी मंदिर, बसवेश्वर पुतळा, होळकर चौक, शिवाजी बँक,  कडगाव रोडवरून आश्रमापर्यंत काढण्यात आली. यावेळी श्री अभिनव मृत्युंजय महास्वामीजींनी प्रवचनाच्या माध्यमातून भक्तगणांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यानिमित्त आश्रमात  दररोज सायंकाळी प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



  

यावेळी अल्लमप्रभू महास्वामीजी, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, मल्लिकार्जुन महास्वामीजी, बसवकिरण महास्वामीजी, अभिनव मृत्युंजय महास्वामीजी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.