Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मर्चंट नेव्हीचे अधिकारी विनायक नरेवाडी यांच्याकडून तेरणी मराठी विद्या मंदिरला स्पोर्ट्स किट प्रदान


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
मराठी विद्या मंदिर तेरणी शाळेत गावचे सुपुत्र व मर्चंट नेव्हीचे चीप ऑफिसर विनायक रामलिंग नरेवाडी यांनी साठ खेळाडूंसाठी स्पोर्ट्स कीट उपलब्ध करून दिले आहे. याचे वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेत करण्यात आले.



 

यावेळी विनायक नरेवाडी यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमधील अनुभव व संघर्षमय जीवन प्रवास याची मुलांना प्रचिती होण्यासाठी "प्रेरणादायी मुलाखत" पार पडली. यावेळी सरपंच करवीर उथळे, उपसरपंच सौ.सोनव्वा मारूती कत्तीगार व सर्व सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी निवृत्ती कोंडुस्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गीता फडके, उपाध्यक्ष प्रवीण चौगुले, सदस्या  सौ. सविता हिरेमठ व सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी,  पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.



सदर कार्यक्रमाचे नियोजन भास्कर पाटील, सखरू भोसले, कामाना नाईक यांनी केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.