Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खेड्यातील आहोत म्हणून न्यूनगंड बाळगू नका, कर्तृत्व सिद्ध करा!

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांचे प्रतिपादन


हरळी बुद्रुकच्या सिंबायोसिस स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थांचा शुभेच्छा समारंभ संपन्न 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): खेड्यातील आहोत म्हणून न्यूनगंड न बाळगता कर्तृत्व सिद्ध केलेली बरीच लोकं ही खेड्यातूनच आलेली आहेत,  हे लक्षात घ्या. आजच्या काळात इतरांपेक्षा तुम्ही कसे वेगळे आहात किंवा इतरांच्यापेक्षा तुमच्याकडे विशेष कौशल्य काय आहे हे दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनो तुमच्यातील वेगळेपण ओळखा आणि स्वतःला सिद्ध करून भविष्यातील अनेक परीक्षांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हा. तुम्हाला यश नक्की मिळेल असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी केले.



सिंबायोसिस स्कूल हरळी बुद्रुक येथे आयोजीत दहावी विद्यार्थांच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिस व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. सतीश घाळी होते.



यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले,  खडतर प्रवासातूनच यशाचा मार्ग काढायचा असतो. त्यामुळे भविष्याचा विचार करता दहावी ही शैक्षणिक जीवनातील पहिली पायरी आहे. विद्यार्थ्यांनो या परीक्षेला सामोरे जाताना घाबरून न जाता निर्भयपणे परीक्षा द्या आणि उज्वल यश मिळवून आईवडील आणि गुरूंचे नाव उज्वल करा.  डॉ. सतीश घाळी यांनी आपल्या मनोगतातून सिंबायोसिस सारख्या शिक्षण संकुलात शिक्षण घेण्याचे भाग्य तुम्हा विद्यार्थ्यांना लाभले आहे, त्यामुळे भविष्यात वाटचाल करताना निश्चितच तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. मुजुमदार  यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करावी आणि शाळेचे व गावचे नाव देशपातळीवर न्यावे असे सांगितले.




कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व पेन देऊन आशीर्वाद आणि बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली. त्याचा स्विकार मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केले. याप्रसंगी वर्गशिक्षक संतोष आंबी यांच्यासह श्रेया पाटील, सलोनी पाटील, सुजल कुंभार, तेजस रेडकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. 



यावेळी अरुण हरळीकर, रामचंद्र होडगे, किरण पाटील, भाऊराव पाटील, संजय पाटील, पोलीस पाटील रेणुका परीट, कविता कागिणकर, अतुल अहिरे, अशोक पाटील, अनुपमा देसाई, दिगंबर पाटील, दत्ता गोंधळी, यलाप्पा कोळी, इंद्र्जित पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी यांनी केले. आभार राजेंद्र शेलार यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.