कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे करण्यात आले पूजन
विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मराठी भाषेविषयी मनोगत
![]() |
| हलकर्णी : मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक आर. एस.पाटील, ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती, एस. एस. मधाळे, एस. ए. पाटील व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी भाग हायस्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक आर. एस.पाटील व ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. वर्षा विनायक पोतदार, संस्कृती अमित खवणेवाडी, अशोक शिंत्रे, स्नेहा हत्तरकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतात विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी असणारी आपुलकी व महत्व याबाबत आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक आर. एस. मठपती, एस. एस. मधाळे, एस. ए. पाटील, सौ. एस.जी.पोतदार, सौ. आर.आर. रामाज, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुहास येणेचवंडी यांनी केले. आभार एस. बी. पाटील यांनी मानले.




