कोल्हापूर : ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा कार्यालय कोल्हापूर येथे करण्यात आले.
यावेळी ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील व ग्राहक तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र सदस्य अशोक पोतनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ग्राहक पंचायतच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन ग्राहक पदाधिकाऱ्यांबरोबर पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी पुरवठा विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी ग्राहक पंचायतचे सतिश फनसे, सुरेश माने, पूनम देसाई, दादासो शेलार, प्रा. सुकुमार नरंदेकर, सदाशिव अंबी, बाजीराव कदम, शिवगोंड पाटील, रमेश दळवी, नवनाथ कुंभार, एम.डी.सुतार, दादासो कोळी, वसंत शिंदे, आरती पोतनीस उपस्थित होते.

