Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री काळभैरव यात्रेसाठी मनसेकडून गडहिंग्लमधून मोफत प्रवास सेवा सुरु

भडगाव रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या निजीक वाहनांची व्यवस्था


भाविकांनी सेवेचा लाभ घ्यावा : जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव यात्रेनिमित्त आज सकाळपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या माध्यमातून भाविकांसाठी यात्रा स्थळापर्यंत मोफत प्रवाससेवा सुरू करण्यात आली आहे. मनसेने यंदा प्रथमच यात्रेकरूंसाठी ही मोफत प्रवास सेवा सुरू केल्याने यात्रेकरूमधून समाधान व्यक्त होत आहे.




गडहिंग्लजमधील भडगाव रोडवरील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजिक भाविकांसाठी मनसेने वाहनांची व्यवस्था केली आहे. शहर ते काळभैरव डोंगरापर्यंत भाविकांना मोफत प्रवास सेवा दिली जात आहे. जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे कार्यकर्ते भाविकांना सदर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.