Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार राजेश पाटील यांच्या विकास निधीमुळे नौकुड गावचा कायापालट

गेल्या तीन वर्षात विकास कामांसाठी भरीव निधी


सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या पाठपुराव्याला यश 


ग्रामस्थांनी केले विकास कामांच्या पत्रिकेचे अनावरण






गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायत मौजे नौकुड येथे गेल्या तीन वर्षात आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून व गावचे सरपंच शुक्राचार्य चोथे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकास कामे झाल्याने नौकुड गावचा कायापालट झाला आहे. या पार्श्वभूमीवर तीन वर्षामध्ये गावामध्ये केलेल्या विकास कामांच्या पत्रिकेचा अनावरण सोहळा आज पार पडला.




चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून गेल्या तीन वर्षामध्ये नौकुड गावामध्ये विविध विकास कामे यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी केलेल्या पाठपुरावाला यश आले आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नौकुड गाव हे एक आदर्श गाव बनले आहे. गावामध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, गटर, शिक्षण, मंदिर तसेच मंदीर परिसर सुशोभिकरण अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास झाला आहे. नौकुड गाव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.




आगामी काळात नियोजित विकास कामे करून गावचा विकास करण्याचे ध्येय गावचे युवा नेतृत्व व कर्तव्यदक्ष सरपंच शुक्राचार्य चोथे यांचे आहे. गेल्या तीन वर्षामध्ये गावामध्ये केलेल्या विकास कामांच्या पत्रिकेचा अनावरण सोहळा आज पार पडला.




 

या विकास कामाच्या पत्रिकेचे अनावरण नौकुड ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, उपसरपंच सौ.रेखा सरदेसाई, ग्रामपंचायत सदस्या  सौ.हिराबाई चौगुले, सौ. सुवर्णा गोसावी, श्रीमती सुरेखा गुरव, देवस्थान समिती अध्यक्ष सुनिल शेलार, तंटामुक्त समिती अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, बाबू बिरंजे, अजित गोसावी जयवंत बिरंजे, भालचंद्र गोडसे, उमेश गोडसे, अनिल पाटील, तुकाराम पाटील, जानबा बिरंजे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ.शितल मांगले, सौ.सविता गोईलकर, सौ.विमल चोथे तसेच ओमकार डवरी, संदेश गोसावी, आदित्य चव्हाण, महेश गोसावी, प्रथमेश गोसावी, हर्षवर्धन गोसावी यांच्यासह  ग्रामस्थ उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.