Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जॉन डियर'साठी संत गजानन रुरल पॉलिटेक्निकमध्ये ७२ विद्यार्थ्यांची निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये पुणे येथील जॉन डियर प्रा.लि. या नामांकित कंपनीसाठी आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ७२ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये संत गजाननच्या ४२ तर इतर महाविद्यालयातून ३० विद्यार्थ्यांची निवड झाली. इलेक्ट्रोनिक्स अँड कम्प्युटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल डिप्लोमा विद्यार्थी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सहभागी झाले होते.




महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत आयोजित या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये गडहिंग्लजसह कोल्हापूर, सातारा, गारगोटी, भुदरगड परिसरातील सुमारे ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अपटीट्युड टेस्ट व एच आर मुलाखत या निकषावर या विद्यार्थ्यांची निवड झाली. यासाठी महाविद्यालयात दि. २० जानेवारी रोजी ऑनलाईन टेस्ट झाली तर दि.३१ जानेवारी रोजी एच आर इंटरव्यू घेण्यात आले.



ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. जॉन डियर प्रा.लि. या कंपनीसाठी एसजीएम रुरल पॉलिटेक्निकचे ४२, डॉ. बापुजी साळोंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (कोल्हापूर)-११, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मालवण -५, डी.वाय, पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग बावडा (कोल्हापूर) व इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हील अँड इंजिनिअरिंग गारगोटी प्रत्येकी-०३ व डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळसंदे कोल्हापूर-१ विद्यार्थांची निवड झाली.




विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, संस्था सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य यांच्यासह सर्व विभागप्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्या सौ.आर.एस. पाटील, ॲकेडेमिक को ऑरडीनेटर एस.व्ही.चौगुले, प्लेसमेंट विभागप्रमुख संतोष गुरव, प्रा. व्ही. आर. मोहिते, प्लेसमेंट कोऑरडीनेटर एम. पी. पाटील, विनायक रेडेकर, अमित डंगी, संजीवनी गाडवी व ए.आय. मुल्ला, श्रीनाथ रावण यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.