गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी शिबीर हनिमनाळ येथे विविध उपक्रम राबवून उत्साहात संपन्न झाला.
सात दिवस चाललेल्या या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातील ग्रामस्थांच्या विविध इलेक्ट्रिक साहित्याची दुरुस्ती करून देत ते कसे वापरावे याबाबत जनजागृती केली. तसेच ग्रामस्वच्छता उपक्रमाद्वारे सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्त्याची स्वच्छता करुन कच-याची विल्हेवाट लावण्यात आली.
विद्यार्थ्यांना योगा, प्राणायामचे धडे देत त्याचे महत्व विशद केले. दररोज विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या यशस्वीतेबद्दल सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यासाठी प्रा. अनिता चौगुले, जयश्री तेली, सरपंच विणाताई पाटील, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, प्राचार्य एस.डी. देवधर, डॉ. एस. एम. पाटील, गटनिदेशक राजेंद्र झुरळे, बी. एस. ढेरे, एस. के. पाटील, आय.एस. गवारे, एन.एस.गुरव, एस.व्ही. जाधव तसेच गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.





