Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश



मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. काल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पक्षासह आमदार पदाचा देखील राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. श्री. चव्हाण यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. आज दुपारी भाजपच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. पक्षप्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय असून राज्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. गेल्या 38 वर्षातील काँग्रेस सोबत असणारा प्रवास थांबवून भाजपमध्ये नव्याने आयुष्याची सुरुवात करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.