गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थिनी कु. कादंबरी कृष्णा पाटील या विद्यार्थिनीने सर्वाधिक 248 गुण मिळवून गडहिंग्लज विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच महाविद्यालयाची कु.श्रावणी लक्ष्मीकांत चौगुले, कु.समीक्षा शिवाजी पाटील या विद्यार्थिनी सी.ए. फौंडेशन परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. या सर्व विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या सर्व विद्यार्थिनींना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.दीपक खेडकर, वाणिज्य इंग्रजी विभाग समन्वयक डॉ. महेश चौगुले व अन्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

