Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशाच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र





गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारत हा विकसनशीलच्या प्रवाहातील देश आहे. विकसित देशांमध्ये आपल्याला सामील व्हायचे आहे. २०४७ पर्यंत या देशाचे विकसित होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले. ते येथील शिवराज विद्या संकुल व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कॉम्प्यूटर सायन्स व इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बीजभाषक म्हणून बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.



प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गिताने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक कॉम्प्यूटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. रवी खोत यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.




प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील पुढे म्हणाले, आपल्या देशात आयातपेक्षा निर्यात वाढले पाहिजे. आपला भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी आपण गतिशील होणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशात कोळसा, तेल व गॅस ही ऊर्जास्रोत उपलब्ध आहेत, त्यांच्या अतिवापरामुळे हवेत घातक वायूचे प्रमाण वाढत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. खरेतर देव निसर्गात आहे, त्यामुळे सर्वांनी निसर्गाची हानी होऊ नये यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. पृथ्वीचे तापमान हे हजारो वर्षे बदलले नव्हते पण औद्योगिकीकरणामुळे ते तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा परिणाम ग्लोबल वार्मिंगवर होत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. आजच्या गतिशील जगात 'कॉम्प्यूटर सायन्स व इनफॉर्मेशन टेक्नोलोजी' हे नवनवीन तंत्रज्ञानाने विकसित होत आहे. या क्षेत्रातून खूप काही करण्याची संधी उपलब्ध होत आहेत याचा लाभ आजच्या विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. आजच्या घडीला नव-नवीन व्यवसायात उतरणे आवश्यक आहे पण केवळ नफा कमविण्याच्या उद्देशाने न उतरता समाजाकरिता योगदान देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. आज शाळा- महाविद्यालयांनी फक्त शिक्षण न देता समाजाच्या गरजा व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिवराज महाविद्यालयाला स्वायत विद्यापीठ होण्याची संधी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी शिवराजला नॅकमध्ये 'ए' ग्रेड मिळाल्याबद्दल सर्वांचे आभिनंदन केले.




यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवराज महाविद्यालय हे समाजाशी ऋणानुबंध जपणारे महाविद्यालय आहे. क्रीडा व अन्य विविध क्षेत्रात आपला उसा उमठविला आहे. शिवाय विद्यार्थी हिताचे व विकासाचे उपक्रम राबवित आहे त्यासाठी आवश्यक असे सहकार्य मिळावी अशी विनंती केली. संस्था अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिवराजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाबरोबर स्वतः ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडला पाहिजे आणि पुढची पिढी विकसित करण्यासाठी नवे प्रयोग करता यावेत यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असल्याचे स्पष्ट करून सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  जे. वाय. बारदेस्कर, ॲड. दिग्विजय कुराडे, राणी चनम्मा बेळगाव विद्यापीठाचे डॉ. एस. एस. गोरनाले, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, डॉ. आर. एस. निळपणकर, कार्यशाळेचे आयोजन समन्वयक प्रा. किशोर आदाटे, सह-समन्वयक ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. के. एस. देसाई, प्रा.रवी खोत यांच्यासह अन्य मान्यवर, प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोमा फर्नांडीस यांनी केले. आभार प्रा. आर. के. पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.