Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलात दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी कॉम्प्यूटर सायन्स व इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी या विषयावर चर्चासत्रे

प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुल व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी 'कॉम्प्यूटर सायन्स व इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांची उपस्थिती लाभणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी एस पाटील, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाने सपन्न होत आहे.



या कार्यशाळेमध्ये राणी चन्नम्मा बेळगाव विद्यापीठाचे डॉ.एस.एस. गोरनाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कॉम्प्यूटर सायन्स विभागाचे डॉ. के.जी. खराडे, के.आर.पी. कन्या कॉलेज इस्लामपूरचे डॉ. डी. आर. पाटील, गव्हर्मेंट कॉलेज आणि पी.जी. सेंटर धारवाड येथील एस. एस. माणगावे यांचे 'कॉम्प्यूटर सायन्स व इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी' या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.


या कार्यशाळेत कॉम्प्यूटर ग्राफिक्स, डाटा मायनिंग, क्लाऊड नेटवर्क, सायबर सिक्युरिटी, बायोमेडिकल इनफॉर्मेशन, डिजीटल मार्केटिंग, सिमेंटींग सोशल आणि वेब सेन्सर, इंटरनेट, आर्टीफिशियल इंटेलीजन्स, मशीन लर्निंग, अल्गोरिदम यासह कॉम्प्यूटरचे अन्य विषयांवर संशोधनपर लेख प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन सत्र होणार आहे. यासाठी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे. तसेच नोंदणी करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी आपली नोंदणी प्रा.आर.के. पाटील-८५५१९६५१५९, प्रा.दीपिका खांडेकर ९४०५१४२२४९, प्रा. व्ही. पी. कळसगोंडा-५४५९९३७१६६, प्रा. एस. जी. शिंदे ९४२००११२०६ यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन समन्वयक प्रा. किशोर आदाटे, सह-समन्वयक ग्रंथपाल  संदीप कुराडे, प्रा के एस देसाई, प्रा रवी खोत करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.