Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील विंधन विहिरीच्या पाण्याचे पूजन

गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते पार पडला कार्यक्रम


रोजगार पूर्व प्रशिक्षण मेळाव्याचे देखील झाले उदघाटन 



                                             छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने खोदण्यात आलेल्या विंधन विहिरीच्या पाण्याचे पूजन गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी बसवकिरण स्वामीजींची उपस्थिती होती. दरम्यान, सूर्या सांस्कृतिक हॉल येथे रोजगार पूर्व प्रशिक्षण मेळाव्याचे देखील उदघाटन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास किरणराव कदम, उदयराव जोशी, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, सुरेश कोळकी, महेश सलवादे, रामगोंडा पाटील, शर्मिला पोतदार, प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते  व नागरिक उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.