Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळी येथे 50 लाखांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ

गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील: सरपंच मलिकार्जुन आरबोळे






मुगळी (श्रीपाद स्वामी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील 50 लाखाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ गावातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे, उपसरपंच बसवराज धनवडे व ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.




येथील वाघ गल्ली,चावडी समोरील व अरुण आरबोळे घर ते मठपती घरापर्यंत काँक्रिटीकरण - २०  लाख निधी. वाघ गल्ली येथे दुतर्फा आरसीसी गटार बांधकाम, ब्लॉक नंबर १ येथील अंगणवाडी ते मेन रोड रस्त्यापर्यंत डांबरीकरण, गुरव घराकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण, ब्लॉक नंबर ३ येथील भरमा धनवडे घर ते मेन रोड पर्यंत गटार बांधकाम या सर्व कामांसाठी वीस लाख रुपये निधी, ब्लॉक १,२,३ मध्ये जोडणार रस्ता,भीमा आरबोळे शेजारील गल्ली व प्रदीप चौगुले गल्ली काँक्रिटीकरण या साठी ३.३३ लाख निधी, विद्या मंदिर मुगळी शाळा देखभाल दुरुस्ती २ लाख निधी, गांधीनगर येथे अजित कांबळे घर ते ओढ्यापर्यंत गटार बांधकाम व पाण्याची नवीन टाकी बांधणे २.१२ लाखाचा निधी, अंगणवाडी क्रमांक  १२२ ते १२३ देखभाल दुरुस्ती व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पत्रा बसवणे १.७५ लाखाचा निधी, असे एकूण जवळपास ५० लाख निधी उपलब्ध झाला आहे. या विकास कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.





लोकनियुक्त सरपंच मलिकार्जुन आरबोळे म्हणाले, गेल्या सव्वा वर्षामध्ये मुगळी गावच्या विकासासाठी सव्वा दोन कोटी रुपयांची विकास कामे गावात केली आहेत. यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते, गटर, पाण्याची व्यवस्था या सर्व विविध विकास कामांचा समावेश आहे. आणखी साडेतीन वर्षांमध्ये उर्वरित कामे करून मुगळी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.





यावेळी उपसरपंच बसवराज धनवडे, संतोष भोसले, चंद्रकांत माने, संपदा पाटील, वर्षा घोटणे, महालिंग चौगुले, सुनिल वाघ,अरुण आरबोळे, निगापा माने, तमाणा माने,अर्जुन धनवडे, दत्तात्रय गुरव, रामय्या स्वामी, आप्पाया मठपती आनंदा शिवारे, राजू चौगुले, बाबुराव जाधव,अनुराज वाघ, बाळासो शिंदे, पूनाप्पा माने, यशवंत मुरकुटे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत संतोष भोसले यांनी केले तर आभार चंद्रकांत माने यांनी मानले.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.