Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

4 जूनला उधळणार लोकसभेचा गुलाल

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका


19, 26 एप्रिल, 7, 13, 20 मे या तारखेला महाराष्ट्रात मतदान


कोल्हापूर व हातकणंगलेसाठी 7 मे रोजी मतदान 


4 जून रोजी होणार मतमोजणी 






नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुका या दिनांक 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत एकूण सात टप्प्यात पार पडणार आहेत. मतमोजणी दिनांक 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहेत. यामध्ये पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे या तारखांचा समावेश आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. आज दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली.




महाराष्ट्रात केव्हा व कुठे मतदान होणार


पहिला टप्पा ( 19 एप्रिल) : नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर


दुसरा टप्पा ( 26 एप्रिल) : वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी


तिसरा टप्पा  ( 7 मे ) : रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.



चौथा टप्पा  ( 13 मे ): नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, बीड, शिर्डी.



पाचवा टप्पा  ( 20 मे): धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.