Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गडहिंग्लजला इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद




गडहिंग्लज (प्रतिनिधी): इंडिया आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सदर बैठक ही ठाकरे पक्ष शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पार झाली.




या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत चर्चा केली. ते म्हणाले, चंदगड, आजरा, गडहिंग्लज या परिसराने आम्हा नेहमीच साथ दिली आहे. तसेच छत्रपती घराण्यावर उदंड असे प्रेम केले आहे. कृषी प्रदर्शन व इतर विविध कार्याच्या माध्यमातून आम्ही आजही जोडलो गेलो आहे. सर्वांनी  सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी शिवसेना शहरप्रमुख संतोष चिक्कोडे यांनी स्वागत केले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप माने,  राष्ट्रीय काँग्रेसचे ॲड. दिग्विजय कुराडे, शहराध्यक्ष बसवराज आजरी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.



जिल्हा युवासेना अधिकारी अवधूत पाटील, वसंत नाईक, विलास यमाटे, युवराज पोवार, संभाजी भोकरे, संदीप कुराडे, सुनील डवरी, सोमगोंडा आरबोळे, शेखरआण्णा येरटी, अजित बंदी, तानाजीराव कुराडे, दयानंद पट्टणकुडी, सुरज माने, अनंत पाटील, प्रा.आझाद पटेल, रावसाहेब पाटील, संतोष चौगुले, उत्तम देसाई, वीरसिंग बिलावर, बाळासाहेब देसाई, प्रा.रवी खोत, शशी गुरव, शाम मोरे, सुमित चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.