संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल, आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटल साईट चिंचेवाडी व आरोग्य उपकेंद्र तेरणी व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तेरणी येथील आरोग्य उपकेंद्रात बुधवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात पुरुषांसाठी संपूर्ण शारीरिक , मौखिक तपासणी, स्त्रियांसाठी स्त्री रोग तज्ञांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी, स्त्रियांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर व स्तनाचा कॅन्सर तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, सर्व प्रकारचे वात विकार, मणक्याचे विकार, संधिवात, आमवात, पक्षाघात, आम्लपित्त, श्वसनाचे विकार, दमा आदी आजारांवर मोफत आयुर्वेदिक सल्ला व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शुगर, ब्लडप्रेशर व ईसीजी आदी तपासण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

