Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरीत राष्ट्रीय दंतवैद्य दिनानिमित्त दातांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन

पालक, विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश व पेस्टचे वाटप





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी येथील साई डेंटल क्लिनिकमध्ये डॉ. अनिलकुमार यादव यांनी राष्ट्रीय दंतवैद्य दिनानिमित्त दातांच्या आरोग्याविषयी पालकांना व लहान मुलांना दांतांच्या आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश व पेस्टचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे नेसरी व महागाव परिसरात कौतुक होत आहे.

     


डॉ. यादव यांनी प्रिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात बदल झाले आहेत. फास्टफुडचा आहारात वापर वाढला आहे. विविध प्रकारच्या चॉकलेट्समुळे लहान मुलांच्या दातांमध्ये गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. दात किडणे, हिरड्यांचे विकार अशा अनेक आजारांचे प्रमाण वाढले आहेत. त्यासाठी त्यांनी कोणती काळजी घ्यावी, ब्रशने दात घासण्याची योग्य पद्धत याची प्रात्यक्षिके करून दाखविले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना टूथ ब्रश व पेस्ट मोफत देण्यात आले.




यावेळी डॉ. जयश्री पाटील, प्रिया डिसोजा यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.