Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चन्नेकुपी येथे मुलींच्या जन्माचे साखर-पेढा वाटप करून स्वागत

महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस पाटील तानाजी कुरळे यांचा उपक्रम 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): चन्नेकुप्पी येथे पोलीस पाटील तानाजी कुरळे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून साखर-पेढे वाटप करून मुलींच्या जन्माचे स्वागत केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





या उपक्रमाबद्दल बोलताना पोलीस पाटील तानाजी कुरळे म्हणाले,  कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंगोत्तर प्रमाणात मोठा फरक असल्याचे माझ्या वाचनात आले. ही बाब चिंताजनक आहे. 20-25 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेली स्त्रीभ्रूणहत्या हे देखील याला कारणीभूत आहे. शासन स्तरावरून देखील याबाबत जागृती करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी आहे या भावनेतून मुलींच्या जन्माचे साखर पेढे वाटप करून स्वागत करत जनजागृती केल्याचे पोलीस पाटील कुरळे यांनी सांगितले.




यावेळी त्यांनी गावात जन्मलेल्या चार मुलींच्या कुटुंबामध्ये जाऊन त्या मुलींच्या आई-वडील यांना साखरपेढा देऊन मुलींच्या जन्माचे स्वागत केले . त्या कुटुंबातील मुलींचे आरोग्य , संगोपन, शिक्षण, करियर चांगले घडवा. मुलगा- मुलगीमध्ये भेदभाव करु नका असा संदेश त्यांनी दिला.




गावातील सई अवधूत नेसरकर,  ज्ञानेश्वरी राजाराम माने, दुर्वा कृष्णा माने, आराध्या मनोज कोकितकर मुलींच्या घरी भेट देऊन त्यांच्या जन्माचे स्वागत केले. त्यानंतर एस.टी. स्टँडवर देखील ग्रामस्थांना साखरपेढा वाटप करण्यात आले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.