Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त



नवी दिल्ली : आजच्या महिला दिनी एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.




पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “महिला दिनाचे औचित्य साधून आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या  किंमतीत 100 रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला  आहे. आपल्या नारी शक्तीचे जीवन सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. "



“स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून,  कुटुंबांच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.  हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखकर बनवण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.