Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात ‘21 व्या शतकातील आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज’ संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात ‘21 व्या शतकातील आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज’ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठ विकास विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या यांच्या प्रेरणेने संस्था सचिव डॉ. अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.





या प्रकाशन समारंभात शिवाजी विद्यापीठ विकास विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज आहे. त्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचे वेळीच व्यवस्थापन करण्यासाठी सर्वांनी सज्ज असणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठ एन. एस. एस. विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत शिवाजी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनीही मार्गदर्शन केले.




संशोधन पत्रिकेचे मुख्य संपादक रजिस्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन आजच्या काळात अत्यंत महत्वाचा व निकडीचा विषय आहे. आपत्ती कोणतीही असो तिच्या नियंत्रणासाठी कोणती उपयायोजना व पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे याची जनजागृत्ती व्हावी यासाठी हा वाचनीय अंक प्रकाशित करण्यात आला आहे असे स्पष्ट केले. यावेळी संचालिका सौ.बिनादेवी कुराडे, डॉ.सरोज बिडकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. हसुरे, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे  यांच्यासह  अन्य मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.