Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी भाग हायस्कूलच्या बालवैज्ञानिकांनी विविध प्रयोग सादर करत मिळवली कौतुकाची थाप!



हलकर्णी (वार्ताहर): येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा, अपूर्व विज्ञान मेळावा असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तयार केलेल्या विविध उपकरणांची प्रात्यक्षिके प्रयोगाद्वारे उपस्थित मान्यवरांना दाखवत कौतुकाची थाप मिळवली.अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. एस. पाटील होते.




स्वागत पर्यवेक्षक के. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक क्रीडाशिक्षक एस. बी. पाटील यांनी केले. यावेळी वार्षिक क्रीडा महोत्सवात विविध खेळात उज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंचा प्रमाणपत्र, पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




सचिन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार अमानुल्ला मालदार, सादिक नगारसे, माजी उपसरपंच गणपती पाटील, माजी सरपंच सचिन कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  



                                          

यावेळी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले. या विज्ञान मेळाव्यात  विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण उपकरणांची मांडणी केली होती. उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग करून दाखवले.




यावेळी बसवराज बोणी, आर. जे. ढेरे, जे. के.दरेकर, आर. आर. रामाज, एम. आर. व्हसकोटी  उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. एस. बंदी यांनी केले. आभार सुहास येणेचवंडी यांनी मानले.












 कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.