शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनरेगा अंतर्गत 95 / 5 योजनेतून मौजे निलजी गावातील गडकरी, जरळी गल्ली व कल्लेश्वर गल्ली येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामी २० लाख रुपये निधी मंजूर झालेल्या कामाचा उदघाटन समारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
सदर कामाचा पाठपुरावा नुतन ग्रामपंचायत सदस्य अजय मजगी यांनी केलेला होता. उदघाटनप्रसंगी उपसरपंच सुरेश कुरबेट्टी, ज्येष्ठ सदस्य बाळगोंडा पाटील, सौ. लक्ष्मीबाई पाटील, सौ. राजश्री मरडी, सौ. प्रेमा नाईक यांच्यासह ग्रामस्थ, विकास सेवा संस्था, दुधसंस्था पदाधिकारी, दोस्ती ग्रुप व दुरदुंडेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फटाके व हलगी वादनाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.


