Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महिलांनो, जबाबदाऱ्या सांभाळत आरोग्याचीही काळजी घ्या !

डॉ. सीमा पाटणे यांचा महिलांना सल्ला 


संत गजानन महाराज शिक्षण समूहामध्ये महिला दिनानिमित्त चर्चासत्र



महागाव :  येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहात महिला दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग संघटनेचे पदाधिकारी, मान्यवर व उपस्थित विद्यार्थिनी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महिलांवर असणाऱ्या विविध जबाबदाऱ्यामुळे त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजारांना बळी पडत आहेत. सध्या स्त्रियांमधील स्तनाचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून त्याची लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू केल्यास होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून बचाव करता येतो. आपल्या निरोगी जीवनासाठी वर्षातून एकदा तरी महिलांनी आरोग्य तपासणी केली पाहिजे असे आवाहन स्त्रीरोग तज्ञ डॉ. सीमा पाटणे यांनी केले.




महिला दिनानिमित्त महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहात आयोजित गडहिंग्लज तालुका स्त्रीरोग संघटनेच्या चर्चा सत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वस्त डॉ. प्रतिभा चव्हाण होत्या.




स्वागत व प्रस्ताविक प्राचार्या रोहिणी पाटील यांनी केले. प्रतिमापूजनाने चर्चासत्राची सुरुवात झाली. यावेळी डॉ. सुरेश संकेश्वरी यांनी सामान्य महिलांच्या आरोग्य समस्या आणि निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम, ध्यान आणि सकस आहाराचे महत्व सांगून सध्या संधिवात, डायबेटीस, उच्च रक्तरक्तदाबच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे स्त्रियांनी प्रथम आरोग्याला प्राधान्य द्यावे असे सांगितले.





या चर्चासस्त्रात डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ, डॉ. किरण हत्ती, डॉ. रूपा कल्याणशेट्टी, डॉ. गीता कोरे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. पूनम पाटील यांनी सहभागी घेत मासिक पाळी, हार्मोन्स बदल, गर्भाशयमुखाचे कॅन्सर, शारीरिक संबंधातून होणारे संसर्ग, मानसिकता, वाढते वय व करिअर याचा समतोल कसा साधावा, लग्न जुळवताना व नंतरची समस्या बाबत योग्य ते निर्णय कसा घ्यावा, गर्भावस्था  याविषयी माहिती दिली. यामध्ये शिक्षण समूहातील विविध विभागातील विद्यार्थिनीनी उस्फूर्त सहभाग नोंदवून प्रश्नोत्तराद्वारे विविध समस्या बाबत निराकरण करण्यात आले.




यावेळी प्रा कल्याणी चव्हाण, प्रा. कविता कुरळे, प्रा. शुभांगी संकपाळ, डॉ. अर्चना मगदूम, डॉ.संगीता मनगुळे, डॉ. अस्मिता कांबळे, प्रा. भाग्यश्री तराळ प्रा. संजीवनी गाडवी, प्रा. सुफिया पटेल यासह विविध महिला कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. मंगल मोरबाळ यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. कविता कुरळे यांनी आभार मानले.





महिलांनी आजारांवर वेळीच उपचार घ्यावेत : डॉ. प्रतिभा चव्हाण


अध्यक्षस्थानावरून डॉ. प्रतिभा चव्हाण म्हणाल्या "भारतात स्त्रियांचे आजार म्हणजे केवळ गरोदरपणा आणि बाळंतपण एवढ्या पुरतेच मर्यादित आहेत. या दरम्यानच त्यांची अधिक काळजी घेतली जाते. यानंतर मात्र वयोमनुसार त्यांना विविध टप्प्यात विविध समस्या निर्माण होत असतात त्याकडे मात्र दुर्लक्ष होतो यासाठी जागरूकता फार महत्त्वाची असून वेळीच लक्षणे ओळखून उपचार सुरू केल्यास कोणत्याच समस्या उद्भवणार नाहीत.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.