Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'शिवराज'च्या श्रुत्ती चौगुले व आरती जाधव यांचे राष्ट्रीय ‘कयाकिंग’ स्पर्धेत धवल यश



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या श्रुत्ती तानाजी चौगुले व आरती प्रवीण जाधव या खेळाडूंनी राष्ट्रीय कयाकिंग स्पर्धेत धवल यश संपादन केले. श्रुत्ती चौगुले यांनी उत्तरखंड, भोपाळ व गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्णपदक, तीन सिल्वरपदक व ब्राँझपदक पटकाविले तर आरती जाधव यांनी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पंजाब पतियाला येथे झालेल्या राष्ट्रीय कयाकिंग स्पर्धेत एक सिल्वरपदक व दोन ब्राँझपदक पटकाविले आहे.




या यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष अॅड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक डॉ.राहुल मगदूम, प्रा.जयवंत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.