शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आल्या शुभेच्छा
कागल : कागल औद्योगिक वसाहतीमध्ये राष्ट्रवादी युनियन कामगार संघटनेच्या प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल अमोल शामराव हेरवाडे यांचा सत्कार शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विनायक इंदुलकर यांनी केले.
यावेळी अमोल हेरवाडे यांच्यासह जावेद जमादार, सयाजी भोसले, सचिन गुरव यांची देखील युनियन प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अमित देवमाने, अतुल कांबळे, श्रीनाथ बारड, मुकेश मठुरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

