गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाच्यावतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन केमक्विझ स्पर्धेत र.भा.माडखोलकर कॉलेज चंदगडचा विद्यार्थी संदेश अमृसकर प्रथम क्रमांक पटकाविला तर शिवराज महाविद्यालयाच्या शुभम पत्ताडे व सुरज पवार यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
या सर्व विजेत्यांना प्राचार्य डॉ. एस. एम. कदम आणि नॅकचे समन्वयक प्रा.किशोर अदाटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रवीण डोंगरे, प्रा. रुपेश पाटील, प्रा. अक्षय तेलवेकर, प्रा.साहिल समडोळे, प्रा. गिरीराज पाटील, डॉ.अल्ताफ नाईकवाडे, प्रा. सतीश नाईक यांनी केले. समन्वयक डॉ. संदीप पाटील व केमिस्ट्री विभागाने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

