Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गडहिंग्लज युनायटेड, गिजवणे हायस्कुलला विजेतेपद

सतरा वर्षे मुले- मुलींच्या गटात राखले वर्चस्व


रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे पार पडल्या स्पर्धा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : डेरवण (जि. रत्नागिरी) येथील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुल आणि गिजवणे हायस्कुल (माळ मारूती) यांनी सतरा वर्षे गटात विजेतेपद पटकाविले. त्यांनी अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात वर्चस्व राखत विजेतेपदासह प्रत्येकी १५ हजार रुपये आणि करडंक पटकाविला. स्पर्धेत एकुण ४५ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदाचे दहावे वर्ष होते.




मुलांच्या गटात गडहिंग्लज युनायटेडने सलामीच्या सामन्यात रत्नागिरी संघाला ५ गोलनी हरविले. दुसऱ्या सामन्यात साताराच्या युनिव्हर्सल अकादमीला ४ गोलनी पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या सेंन्ट अँन्ड्रजला ३ गोलनी पराजित केले. शेवटच्या सामन्यात कोल्हापूरच्या एसथ्री अकादमीला १ गोलने नमवून विजेतेपद मिळविले. संघाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांचे मार्गदर्शन तर संघव्यवस्थापक सुल्तान शेख, ओमकार सुतार यांचे प्रोत्साहन मिळाले. युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी यांनी संघाचे अभिनंदन केले.




मुलींच्या गटात गिजवणे हायस्कुलने पोतदार स्कुलचा ७ गोलनी पाडाव केला. दुसऱ्या सामन्यात साताराच्या श्यामसुंदरी अकादमीवर ३ गोलनी मात केली. उपांत्य फेरीत बेळगावच्या एमएसडीएफला १ गोलनी नमविले. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या एसर्थ्री अकादमीला श्रावणी सावंतच्या महत्वपुर्ण गोलच्या जोरावर हरवत अजिंक्यपद पटकाविले. गोलरक्षक प्राजक्ता येसरे हिने चिवट खेळ करून विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. संघाला महेश जगताप, शैलेश दळवी यांचे मार्गदर्शन मिळाले. दोन्हीं संघाना प्रत्येकी १५ हजार रुपये आणि प्रतिष्टेचा करडंक देऊन गौरविण्यात आले.



दोन्ही विभागात पहिल्यांदाच विजेतेपद

 

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुले आणि मुली दोन्ही विभागात गडहिंग्लजच्या संघानी विजेतेपद पटकाविले. गडहिंग्लज युनायटेडने यापुर्वी या स्पर्धेत चौदासह सतरा आणि एकोणीस गटाचे विजेतेपद पटकाविले आहे. मुलींच्या गटात प्रथमच खेळणाऱ्या गिजवणे हायस्कुलने मुसंडी मारून विजेतेपद पटकावले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.